Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याने फुलवली सफरचंदाची बाग

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

            काश्मीरच्या सफरचंदाची फळबाग आता माळशिरस तालुक्यातील लवंग येथे फुलू लागली आहे.अडीच वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांना प्रथम सफरचंद लागल्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

          माळशिरस तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महादेव ज्ञानोबा भोसले (वय ६०) यांनी त्यांच्या शेतात सफरचंदाच्या झाडाची रोपे ३० गुंठामध्ये १७५ रोप २०x१० फुटाच्या अंतराने लावली आहेत.साधारण चाळीस वर्ष झाडे टिकावे यासाठी हे अंतर ठेवले आहे.यावर्षी प्रथमच झाडांना सफरचंद लागली आहेत.आज या प्रत्येक झाडाला २ ते ३ किलो सफरचंद लागत आहेत.हे पहिले उत्पादन घेतलेले आहे.त्या बरोबर सफरचंदाच्या बागेमध्ये अडीच वर्षात हरभरा,लसूण कांदा यांचे अंतर पीक ही घेतलेले आहे.


             सफरचंदाच्या झाडाची रोपे परंडा (ता.भूम) येथून दादासाहेब कोलते यांच्याकडून आणली आहेत.पाऊण एकरात रोपे लावून त्या झाडांना शेणखत,१०/२६/२६ खत, १८/४६ खत,भूमाता रियल, भूमाता कॅलगेन,निंबाळी पेंड हे डोस चार महिन्यांतून एकदा दिलेला आहे.बोअलवेलचे पाणी ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून दिले आहे.हे फळबाग घेण्यासाठी लवंग (२५/४) येथील श्री महालक्ष्मी कृषी केंद्राचे रणजीत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात श्री.भोसले यांनी अडीच वर्षात पहिल्याच सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे.


           महादेव भोसले यांना लहानपणापासून शेती आवड असल्यामुळे ते नेहमी शेतात नवनवीन पीके घेऊन प्रयोग करत असतात.त्यांच्या साडेसात एकर जमीनीमध्ये यापूर्वी ऊस,गहू, ज्वारी,केळी पिके घेतली आहेत तसेच मत्सपालन व्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय केला आहे.आता सफरचंदाची बाग लावली आहे.

           या यशाबद्दल बोलताना श्री भोसले म्हणाले की, शेतक-यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर शेती व्यवसाय केला तर फायदेशीर आहे.तसेच शेतीचे व्यवसायाचे योग्य नियोजन, किफायतशीर खर्च करून चांगले उत्पादन मिळाले तर शेती व्यवसाय चांगला दिवस येतील.ऊस,केळी,गहू,मका अन्य पीके घेत असताना शेतकरी वर्गाने नवीन पीक घेऊन प्रयोग करावा.


*चौकट*

*महादेव भोसले यांनी शेतीच्या व्यवसाय आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले आहे.एका मुलाला बी.ई.सिव्हिल इंजिनिअर शिक्षण दिले आहे तर तीन मुलींना पदवीधरपर्यंत शिक्षण दिले आहे.त्यात एक मुलगी फॅशन डिझायनर आहे तर दुसरी आर्किटेक्चर झाली आहे.*






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा