उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळीनगरचे शिल्पकार कै. हरिभाऊ बळवंत गिरमे यांची १२५ वी जयंती येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. व्यासपीठावरील प्रतिमेचे पूजन शिक्षिका किशोरी चवरे, वैशाली बनकर व रूपाली नवले यांचे हस्ते करण्यात आले तसेच शालेय परिसरातील कै हरिभाऊ गिरमे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश गिरमे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशालेचे नूतन प्राचार्य कलाप्पा बिराजदार, नूतन उपप्राचार्य रितेश पांढरे, व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी जिया शेख,आर्या माने,सानिका होनमाने यांनी भाषणे केली.त्यांना मान्यवरांच्या हस्ते पेन देऊन कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अभिजीत हेगडे व रणजीत लोहार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर आभार रणजीत लोहार यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा