*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापुर येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे अधिकृत नोंदणी असलेल्या व मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्नित माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष्यपदी --कृष्णा लावंड तर उपध्यक्षपदी अनंत दोशी आणि शिवाजी पालवे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार संघ माळशिरस ही संघटना माळशिरस तालुक्यातील एक नोंदणीकृत पत्रकार संघटना असुन अकलुज येथे दि.25 फेब्रुवारी रोजी संघटनेच्या पदाधिकारी निवाड बैठक संपन्न झाली .या बैठकीत अध्यक्षपदी- कृष्णा लावंड,उपाध्यक्ष (पश्चिम)अनंत दोशी पुर्व उपाध्यक्ष शिवाजी पालवे तर ,सचिवपदी दै.पुढारीचे मंगेश सोनार,खजिनदार ,दै.सकाळचे विलास सांळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली .यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रहास सिदवाडकर,रामचंद्र मगर,किरण जाधव उपस्थित होते.
या संघटनेमध्ये तालुक्यातील नामांकित दैनिके आणि साप्ताहिक वर्तमान पत्रांचे प्रतिनिधी सदस्य आहेत.2017 साली संस्थापक किरण जाधव यांनी नोंदणी केलेली आहे.आजपर्यंत माळशिरस येथील जेष्ठ पत्रकार चंद्रहास सिदवाडकर,श्रीपुर येथील मनोज गायकवाड ,यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली आहे.तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, निमगाव (म)येथील रामचंद्र मगर यांचे मार्गदर्शनाखाली संघटनेने आजपर्यत हेल्मेट वाटप,डाॕ.एम.के.इनामदार यांचे हाॕस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी यासारखे ऊपक्रम राबविण्यात आले असल्याचे यावेळी नुतन अध्यक्ष कृष्णा लावंड यांनी सांगितले .
भविष्यातही संघटना पत्रकारांच्या आरोग्याविषयी जागृत राहुन पत्रकांसाठी प्रामाणिक कार्य करणार आहे.पत्रकारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असुन विविध सामाजिक ऊपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी कृष्णा लावंड यांनी सांगितले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा