Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

अकलुज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या विरोधात ,कडक पोलिस बंदोबस्त मध्ये उपोषणाचा दुसरा दिवस.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी

*मो.9730 867 448

             Akluj Vaibhav News Network. 

Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.

Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.

Mo. 9860959764.


अकलूज दिनांक 27/02/2024 :

येथील बॅकवर्ड हाउसिंग सोसायटी मधील रस्त्यावरील अतिक्रमणे काढून त्यांचे पुनर्वसन घरकुल योजनेच्या माध्यमातून होऊन त्या ठिकाणी नागरी सुख सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस असून ऊपोषणकर्त्यांच्या संरक्षणासाठी अकलूज पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला आहे. सदर जागेमध्ये मनगटशाही, दडपशाही आणि राज्यकर्त्यांच्या आधाराने अतिक्रमण करून आपल्याच समाज बांधवांचे जीवनमान उंचावण्यापासून रोखणाऱ्या तथाकथित गुंड प्रवृत्तीच्या पुढार्‍यांचे धाबे दणाणले आहेत तर पुढाऱ्यांच्या महिला वर्गातून असे फुत्कार टाकण्यात येत आहेत की "बघूच अतिक्रमण काढायला कोण येतंय ते". पुढाऱ्याच्या महिला वर्गातूनअसले बोलणे म्हणजे

 या ठिकाणी गेले दोन दिवसापासून उपोषणास बसत असणाऱ्या वयोवृद्ध माता-भगिनींना एक प्रकारे धमकावण्याचाच प्रकार महिलांच्याडून पुढारी मंडळी करीत आहेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. काही समाजकंटकांकडून अशी अफवा पसरवण्यात येत आहे की "उपोषणकर्ते येथील सर्वांनाच उठवून जागा सरकार जमा करणार आहेत". अशा खोट्यानाट्य अफवा पसरवून ताणतणाव निर्माण होऊन भांडणे पेटावीत. असे उपद्रव्याप काही स्वार्थी मंडळींनी सुरू केले आहेत.

आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

अकलूज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ सुरू असलेल्या उपोषणास समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ मोहन जाधव, सागर सिद्धार्थ जगताप, कबीर शंकर खंडागळे, सदाशिव ज्ञानोबा धाईजे, माणिक हिरामण साळुंखे, राहुल किसन लोखंडे, राजीव आंगद गायकवाड, हिरा तानाजी धाईंजे, तुषार वसंत लोंढे, विकास आनंदा वाघमारे, आप्पा निवृत्ती मोरे महाराज, अनिल योगीनाथ कांबळे, सखुबाई सदाशिव धाईंजे (वय 65 वर्षे), विजया पांडुरंग गायकवाड (वय 65 वर्षे), लोचना मोहन जाधव (वय 65 वर्षे), सिंधुबाई नारायण लोंढे (वय 72 वर्षे), कलावती अशोक खरात(वय 80 वर्षे), लहू कांतीलाल धाईंजे, मोहन ज्ञानोबा धाईजे, मधुकर मारुती कांबळे, अमोल बाळासाहेब माने, पांडुरंग बंडा कांबळे, पत्रकार संजय खरात, देविदास भागवत भोसले, विनायक आगंद गायकवाड, अजित गोविंद नाईकनवरे, सौ वंदना भारत वाघमारे,राजू रामा जाधव, गणेश वसंत करमाळकर, भारत महादेव वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा