*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज, ता.११: येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. ११/२/२०२४ रोजी कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांच्या हस्ते काकासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामधील प्राध्यापिका प्रीती सोमवंशी यांनी काकासाहेब यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय दिला.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी काकासाहेबांच्या महान कार्याची माहिती देऊन त्यांच्या कार्याची ज्योत कायम आपल्या कामातून तेवत ठेवूया असे सांगितले. तसेच काका साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्या मनात ठेवून समाजाच्या जडणघडणीमध्ये आपणही खारीचा वाट उचलला पाहिजे असे सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत कासे यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा