*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
14 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या" गाव चलो "अभियानांतर्गत ज्यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीसाठी योगदान दिलं अशा लोकांचा सन्मान करण्याचा आदेश देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज भा.ज.पा.चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अकलूज माळेवाडी येथील जनसंघापासून व देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर ज्यांनी काम केलं असे "विठ्ठलराव शिंदे "यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला तसेच श्रीपूर येथील भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते गुंडोपंत मोकाशी व भाऊसाहेब कुलकर्णी यांचाही त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुभाष गांधी यांचा त्यांच्या खंडाळी या गावी जाऊन सन्मान करण्यात आला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पत्रिका देण्यात आली हे अभियान राबवण्यासाठी व भेटीगाठीसाठी माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये भा.ज.पा.चा दौरा चालू आहे यामध्ये सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के .पाटील ,भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे ,माजी जिल्हा उपाध्यक्ष सोपानं नारनवर , सो.जि. अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू ,संघटन सरचिटणीस व माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष -युवराज वाघमोडे, अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे ,व मिनीनाथ मगर आदी मान्यवर या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा