*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज शंकरनगर येथील राज्यस्तरीय लावणी नृत्यस्पर्धेत पिंजरा कला केंद्र वेळे(सातारा) च्या ज्योत्स्ना,रुक्मिणी,अर्चना वाईकर,न्यु अंबिका कलाकेंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला,वैशाली समसापुरकर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र सणसवाडी (पुणे)यांना विभागुन प्रथम क्रमांक मिळाला असून रोख पाच लाख रुपये,स्मृतीचषक, प्रशस्तीपत्र असे बक्षीस तिनीही पार्ट्यांना माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
शंकरनगर अकलूज येथील स्मृतीभवनाच्या बादशाही रंगमंचावर स.म.शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील बंधु यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्ताने राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक ओम भगवती सांस्कृतिक कला केंद्र नांदगाव (अहमदनगर), तीन लाख रूपये,तृतीय क्रमांक मंगल,माया,प्रिती खामगांवकर नटरंग कला केंद्र मोडनिंब (सोलापूर),एक लाख रूपये,चतुर्थ क्रमांक विद्या,पुजा,किरण काळे रोईकर पार्टी भोकर फाटा (नांदेड) ७५ हजार तर पाचवा क्रमांक छाया,पुजा,श्रध्दा, कोल्हापूरकर रेणुका कला केंद्र अंबप फाटा (कोल्हापूर) व सुनिता परभणीकर नटरंग कला केंद्र मोडनिंब सोलापुर ५१ हजार रोख स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र असे बक्षिसे दिलीप सोपल यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी जयसिंह मोहिते पाटील,स्वरुपाराणी मोहिते पाटील,पांडुरंग घोटकर, अशोक जाधव,किसन जाधव, सरलाबाई नांदुरेकर,राजश्री नगरकर,सुरेखा पवार रेश्मा परीतेकर,वैशाली जाधव,प्रमिला लोदगेकर,स्पर्धेचे परीक्षक प्राचार्य डॉ. मधुकर गायकवाड (लातूर), प्राचार्य डॉ शशिकांत चौधरी (कोल्हापूर),प्राचार्य डॉ.चंद्रकांत जोशी(अहमदनगर)आदी मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक पारितोषिकात रु एक हजार उत्कृष्ट तबलापटु राहुल जावळे,पेटीवादक विकी जावळे,ढोलकीपटु नितीन जावळे, पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी,अदा ज्योत्स्ना वाईकर तर मुजरा रोख पाच हजार ज्योत्स्ना वाईकर पिंजरा कलाकेंद्र वेळे, व वैशाली समसापुरकर सणसवाडी यांना विभागुन देण्यात आले. यावेळी बोलताना दिलीप सोपल म्हणाले की,अकलुजची लावणी म्हणजे लावणी कलावंत व रसिकांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन असते.कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला असून कलाकार व कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे.माणसाला शारिरीक उर्जे बरोबर मानसिक ऊर्जा हवी असते.कोणाला वाचनातून तर कोणाला कलेतुन उर्जा मिळते.लावणी लोक कलेतुन प्रबोधन,अध्यात्म,भक्ती प्रकट होत असल्याने लावणी कलेतुन मानसिक ऊर्जा मिळते.स.म. शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यांच्या हयातीत तमाशा परिषद स्थापन करुन मराठमोळ्या लोककला,कलावंतांस लोकाश्रय मिळवुन दिला.त्यांच्या पाश्चात जयसिंह मोहिते पाटील यांनी गेली २७ वर्षे खांद्यावर धुरा सांभाळली असून बाळदादांच्या खांद्यावरील भार आपल्या खांद्यावर घेत स्वरुपाराणी मोहिते पाटील नव कलाकार व रसिकांना बरोबर घेऊन भक्कमपणे वारसा पुढे नेत असुन त्यांनी परंपरा अखंडपणे कायम ठेवावी अशी अपेक्षा सोपल यांनी व्यक्त केली.पाच वर्ष कालखंडानंतर लावणी कलावंत व रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून ७० टक्के नवे कलाकार असूनही त्यांनीं उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.पुढील वर्षी पुन्हा भेटू असे स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी सांगून पुढे लावणी नृत्य स्पर्धा सुरू ठेवण्याचे संकेत दिले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.दत्ता बारबोले व नितीन बनकर यांनी करुन आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा