*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचं म्हटलं जातंय. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याचे सांगण्यात येतंय.
अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चव्हाण यांची चर्चा झाल्याचेही सांगण्यात येतंय.
फोन नॉट रिचेबल
अशॊक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल लागत असल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सवर भावी खासदार म्हणून अशोक चव्हाण यांचा उल्लेख केलाय.
या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या
तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असं म्हटलं जातंय.
भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यातच नणंदेच्या भाजप कार्यालयात मोठ्या काँग्रेस नेत्याचा पक्ष प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळातही चर्चां ना उधाण आलंय.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा