*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. १०.०२.२०२४ रोजी पुणे येथील "टेक्नोलर्न ट्रेनिंग्ज" या संस्थेमार्फत प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
याबाबतीत अधिक माहिती देताना ते म्हणाले, महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून सदर प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे स्पर्धेचे युग पाहता, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणून महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने तृतीय व अंतिम वर्ष अभियांत्रिकीमधील कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग या विभागातील विद्यार्थ्यांसाठी सदर ड्राईव्ह आयोजित केला गेला. या ड्राईव्ह मध्ये महाविद्यालयातील ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच सदर उपक्रमाअंती अभियांत्रिकी महाविद्यालय व टेक्नोलर्न ट्रेनिंग्ज, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. योगेश शेटे, टेक्नोलर्न ट्रेनिंग्जचे प्रिया जोशी, प्राजक्ता काळे व आदी उपस्थित होते. सदर ड्राईव्ह यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. योगेश शेटे, तसेच प्रा. रोहन पोरे, प्रा. शुभम कुलकर्णी, प्रा. प्रशांत देवकाते, प्रा. अनिल कोकरे यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा