*ज्येष्ठ पञकार--संजय लोहकरे.
अकलूजच्या लावणी स्पर्धेला एक परंपरा असून कलाकरांच्या कलेला न्याय देण्यासाठी अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी लावणी स्पर्धेचे आयोजन करून लावणी कलावंताना लोक मान्यता मिळवून दिली.अशाच एक वर्षी लावणी स्पर्धेला तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही उपस्थित राहून लावणी कलावंताच्या कलेला दाद दिली होती.
शंकरनगर-अकलूज येथे *सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या* वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास महाराष्ट्र राज्याचे *तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख* यांनी आवर्जून उपस्थित राहून विजेत्या लावणी नृत्यांगनाला बक्षीस त्यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले होते.यावेळी छायाचित्रात *ना.विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार उल्हासराव पवार,जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील.*(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा