Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा कार्यकर्ता असून त्यांच्या धोरणाला कधीही सोडणार नाही - माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, लुमेवाडीसाठी आजपण, कालपण, उद्यापण देण्यास कमी पडणार नाही.

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

              - काही लोक मताच्या राजकारणासाठी हिंदू मुस्लिम समाजामध्ये भेदभाव निर्माण करून पोळ्या भाजून घेत आहेत. परंतू मी फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा कार्यकर्ता असून त्यांच्या धोरणाला कधीही सोडणार नसल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.



    लुमेवाडी ( ता. इंदापूर ) येथील ८ कोटी २० लक्ष रूपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटनप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, दत्तात्रय घोगरे, सचिन सपकाळ, श्रीकांत बोडके, नवनाथ रूपनवर, पांडुरंग डिसले, दादासाहेब क्षिरसागर, सुरेश शिंदे, आण्णासाहेब कोकाटे, सरपंच पोपट जगताप, सुदर्शन बोडके, संतोष सुतार उपस्थित होते.



    आमदार भरणे पुढे म्हणाले, सलग २० वर्ष मंत्री म्हणून काम करणाऱ्यांनी या कालखंडात इंदापूर तालुक्यातील मुस्लिम मोहल्ला, मागासवर्गीय वस्त्यांना जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले. परंतु आपण आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुस्लिम समाज बांधवांसाठी अल्पसंख्याक विभागाचा स्वतंत्र निधी आणून प्रत्येक गावातील मुस्लिम मोहल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. तसेच इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला असून संकुचित प्रवृत्तीच्या मंडळींना आपण केलेला विकास बघवत नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे याहीवेळी त्यांची राजकीय डाळ शिजणार नाही हे त्यांनी (हर्षवर्धन पाटील) ओळखले असल्यामुळे नेहमीप्रमाणे कूटनीतीचा अवलंब करत जाती-धर्माचा उल्लेख करून जाणीवपूर्वक तालुक्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोपही यावेळी आमदार भरणे यांनी केला.

    तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी जलजीवन योजनेचे आराखडे तयार करून कार्यान्वित करण्याची काम केले. पूर्वी तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी रस्त्याची काय अवस्था होती, किती यातना सहन कराव्या लागत होते. लुमेवाडी येथे मुस्लिम समाज जास्त असून त्यासाठी दर्गा, दफनभूमी संरक्षक भित व सभागृहाचे काम केले आहे.

    लुमेवाडी बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल. लुमेवाडीला आज पण काल पण उद्या पण जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. दर्गा जवळील भाविकांच्या सभामंडपाचे पन्नास लाखाचे काम येणाऱ्या ऊरूसापूर्वी पूर्ण केले नाही तर मला मतदान करू नका. जे बोलतो ते पुर्ण करणारा खणखणीत नाणं असणारा मी कार्यकर्ता आहे. लिंबोडी येथे बंदिस्त व लुमेवाडी येथे खुली जिम येत्या आठ दिवसात बसवून देण्यात येईल असे शेवटी भरणे यांनी बोलताना सांगितले.

   यावेळी श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, अलहाज अब्दुल गनी शेख, प्राध्यापक सय्यद सर, सलीम पठाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उस्मान शेख यांनी सुत्रसंचलन शब्बीर शेख तर आभार सुनिल जगताप यांनी मानले.

चौकट - इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी बरोबरच हजरत चांदशावली बाबांच्या दर्ग्यालाही विकास आराखड्यामध्ये कोट्यावधींची तरतूद केली आहे. त्यामुळे राम रहीम आपल्यासाठी एकच असून सर्वधर्म समभावाची शिकवण आपल्याला आहे. 

फोटो - लुमेवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा