*निमगाव (म)----प्रतिनिधी*
*रामभाऊ मगर*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9130 101 806.
खून खटल्यातील साक्षीदारावर हल्ला आरोपीचा जामीन मंजूर
अकलूज येथील नाना आसबे गोळ्या झाडून खून प्रकरणातील साक्षीदारावर प्राण घातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी रोहित राजू उर्फ राजकुमार भोसले व शिवराज पिंटू उर्फ अतुल मोहिते राहणार अकलूज यांचा जामीन अर्ज माळशिरस न्यायालयाने मंजूर केला.
सन 2016 मध्ये देवकर खून खटल्यातील नेत्र साक्षीदार नाना आसबे याचा प्रदीप प्रदीप माने ,देवा जाधव, रमेश धुळे ,दशरथ विठोबा माने, अतुल गोरख इंगळे, राजू मधुकर भोसले,साजिद इब्राहिम सय्यद ,सचिन दामोदर एकतपुरे,सागर प्रताप मोहिते या लोकांनी कट रचून खून केल्याने त्यांच्याविरुद्ध खुनाच्या व मोक्याच्या आरोपाखाली खटला माळशिरस सत्र न्यायालयात प्रलंबित आहे त्या खटल्यामध्ये गणेश सदाशिव भोसले हा महत्त्वाचा साक्षीदार आहे सदर केस ची नियमित सुनावणी सुरू होणार आहे.असे असताना नाना आसबे खून केसमधील साक्षीदार आहेस तू त्यास जास्त क्रॉस करू नको वकील देऊ नको असे म्हणून दबाव टाकत होते यात अटकेतील आरोपी रोहित भोसले व शिवराज मोहिते यांनी माळशिरस येथे सत्र न्यायालयात अॅडव्होकेट संदीप मगर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यात मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट श्री बी आर भिलारे सरकारतर्फे अॅडव्होकेट संग्राम पाटील यांनी तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट संदीप मगर यांनी काम पाहिले.
*कोर्टापुढे युक्तिवाद*
यामध्ये मुख्य आरोपीतर्फे एडवोकेट संदीप मगर युक्तिवाद करताना अंतिम दोषारोप पत्र दाखल झाले आहे दिनांक 7 9 2023 पासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्याकडून सध्या काही एक जप्त करायचे नाही माननीय न्यायालय लादतील त्या अटी शर्तीचे पालन करण्यास तयार आहे व मुंबई उच्च न्यायालयाच्या Citation चा आधार घेत आरोपीचा जामीन मंजूर करण्यासाठी युक्तिवाद केला,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा