इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. नवी दिल्ली येथे शुक्रवारी (दि. १६) झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निवड झाली. पाटील व पटेल यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असेल. मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांच्यानिमित्ताने सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेवर भाजप नेत्याची वर्णी लागल्याने साखर कारखानदारीत भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा नवी दिल्ली येथे गुरुवारी (दि. १५) झाली. यात १२ संचालकांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत हर्षवर्धन पाटील व केतनभाई पटेल यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. दांडेगावकर गेली पाच वर्षे म्हणून कार्यरत होते. ते S शुतर पवार को निकहतनीय मानने जातात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता, आता हर्षवर्धन यांच्या रूपाने प्रथमच भाजपला या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी आपल्या नेत्याला बसविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे साखर कारखानदारीत भाजपने पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकारमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर कारखानदारीबाबत नवे धोरण आखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी अनेकदा दिल्लीवारी केली, पाटील यांनी शाह यांना मदत केल्यामुळे त्यांना अध्यक्षपद देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
"आर्थिक सुधारणा आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या या काळात देशातील साखर उत्पादनात ३५ टक्के वाटा हा सहकार क्षेत्राचा आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय सोपविल्यापासून केवळ २७ महिन्यांत ५४ नवे निर्णय घेण्याचा विक्रम या नव्या सहकार मंत्रालयाने केला आहे. त्यातील बऱ्याच निर्णयांची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे."
- हर्षवर्धन पाटील,
नवनिर्वाचित अध्यक्ष,
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा