*सतीश रामचंद्र खोपडे मंगरूळ ता.तुळजापूर
बालवयात स्वराज्यासाठी ज्यांना दिलेरखानाच्या गोटात राहावे लागले, असा शिवरायांचा छावा वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या कराल दाढेत शिवछत्रपतींसोबत आग्र्याला अडकलेले, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण या संस्कृत ग्रंथांची रचना करणारे, तसेच सातसतक, नाईकाभेद आणि नखशिख या ग्रंथाचे रचनाकार, पराक्रमी, निर्भीड, निर्व्यसनी, विद्वान संस्कृत पंडित, चारित्र्यवान, प्रजाहितदक्ष छत्रपती संभाजी महाराज...
● छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फ्रेंच प्रवासी अबे कॅरे लिहितो,
"शिवाजीमहाराजांनी एक सर्वात शूर अशा दहा हजार सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या वडिलांच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्यांना शिवाजीराजासारखाच मान देतात. फरक इतकाच कि ह्या सैनिकांस संभाजीराजेंच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात..."
स्वराज्यरक्षक छत्रपती श्री संभाजीराजे जन्मोत्सव.
१४ मे, किल्ले पुरंदर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा