*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका मेकॅनिकल विभागाचे १००% प्लेसमेंट झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे यांनी दिली.
याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी महाविद्यालयातील पदविका मेकॅनिकल विभागातील तृतीय वर्षांमधील सर्व विद्यार्थ्यांचे टाटा मोटर्स, जॉन डीयर, एल अँड टी, कमिन्स यासारख्या नामवंत कंपनींच्या विविध ठिकाणी झालेल्या पूल कॅम्पस ड्राईव्ह मधून मुलाखतींद्वारे निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा दि. १७.०२.२०२४ रोजी महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी ट्रस्टचे सचिव मा. श्री. राजेंद्र चौगुले, तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. विराज निंबाळकर, श्री. वसंतराव जाधव व श्री. प्रतापराव पाटील तसेच महाविद्यालयाचे संचालक मंडळ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा मा. कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील सर्व विभागामधून १०० टक्के प्लेसमेंटची अपेक्षा व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा