*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार लॉंगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका सह संघटकपदी यशवंतनगर येथील मिलिंद चव्हाण यांची तर युवक तालुका सरचिटणीसपदी माळेवाडी अकलूज येथील तुषार केंगार यांची निवड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून निवडीचे पत्र देऊन सत्कार करून करण्यात आली.
शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासकीय विश्रामगृह अकलूज येथे सदरच्या निवडी जाहीर करून नूतन पदाधिकारी यांचा महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते हार गुलाब व निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडीला उत्तर देताना मिलिंद चव्हाण व तुषार केंगार यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद माळशिरस तालुक्यात वाढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान तालुका सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड युवक अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान कार्याध्यक्ष शहाजी खडतरे यांचे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा