Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

*"इंडिया "गटबंधन मजबूत होताना दिसतं म्हणून" जोड गोळी "अस्वस्थ*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

           पहिल्या फेरीत 'भाजपात सामील व्हा' यासाठी दबाव टाकून नेते भाजपात घेतले गेले, आता दुसर्‍या टप्प्यात 'भाजपात आला नाहीत तरी चालेल, इंडिया आघाडीतून बाहेर पडा' असा अगतिकपणा सुरू झाला आहे. 


अजितदादा, भुजबळ, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, नारायण राणे, सुनील तटकरे इत्यादींना ईडी दाखवून भाजपात घेतलं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. तरीही इंडिया गठबंधन मजबूत होतांना दिसलं म्हणून जोडगोळी अस्वस्थ होती. साडेतीनशे जागांवर जर एकास एक लढत झाली तर आपलं खातं कायमचं बंद होणार हे लक्षात आल्यावर अगतिक सत्तालंपटांनी आता 'भ्रजपाशी जुळवून घेतलं नाही तरी चालेल, निदान इंडिया आघाडीत राहू नका नाही तर ईडी लावू' अशी गुंडगिरी सुरू केली आहे. 


हेमंत सोरेन यांना दोन डील देण्यात आल्या, भाजपा सोबत सरकार किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडणे. त्या दोन्ही त्यांनी नाकारल्या. त्यांच्या सगळ्या आमदारांनी खुल्या बैठकीत सांगितलं की आपण झुकायचं नाही, आदिवासी झुकत नसतात. मग एका प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला (जो त्या प्रकरणात अडकला आहे) माफीचा साक्षीदार करून हेमंत सोरेनला घेरण्यात आलं. आधी त्यांचे भाऊ बसंत सोरेन यांना फोडण्याचा या सत्तालंपट पक्षानं प्रयत्न केला पण तो ही अयशस्वी झाला. भ्रजपा बरोबर सरकार बनवायचं नसेल तर बनवू नका पण इंडिया आघाडीतून बाहेर तरी पडा' अशी दुसरी डीलही सोरेन यांनी नाकारली म्हणून मग जेलमध्ये पाठवण्यात आलं. 


नीतीशकुमारनं इंडिया आघाडीची पाटण्यात बैठक बोलावली त्यानंतर त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांवर ईडीची मगरमिठी बसली. सगळीकडून कोंडी केल्यावर पलटूराम घाबरून शरण गेला. सत्तालंपट जिंकले. 


ममता बॅनर्जीची कथा अशीच आहे. अभिजीत बॅनर्जी या त्यांच्या भाच्याला ईडीनं घेरलं. त्यांच्या पक्षातील अनेकांना घेतलं तसं ममता बॅनर्जींनी शस्त्रसंधी केली. भाजपसोबत गेल्या नाही कारण बंगालात तीस टक्के मतदार मुस्लीम आहेत, मात्र इंडिया आघाडी तोडली. 


इंडिया आघाडीत जाऊ नका यासाठी आता अरविंद केजरीवाल यांच्यावर दबाव टाकणं सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मनिष सिसोदिया आणि संजयसिंग आत टाकले गेले. आता अरविंदवर दबाव आहे की इंडीया आघाडी की ईडी हे ठरवा. मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल बळी पडणार नाही कारण आर्थिक चारित्र्य स्वच्छ

आहे. दबाव घ्यायचाच असता तर सिसोदियाला अटक केली तेव्हाच घेतला असता. 


महाराष्ट्रात काही पळपुटे निघाले तरी 'करा काय करायचं ते' म्हणत सगळ्या हालअपेष्टा सोसून विरोधात ठामपणे उभे राहणारे संजय राऊत, अनिल देशमुख हे असे बहाद्दरही निघाले. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली पण आज हे दोन्ही पक्ष नवी उभारी घेऊन पुन्हा जोरकसपणे उभे आहेत. महाराष्ट्रात तरी इंडिया आघाडीला धोका नाही.


भ्रष्टाचारी जमाओ पार्टी नैतिकदृष्ट्या आखरी सांसे ले रही है. नैतिकतेची सगळ्यात शेवटची पायरी गाठल्यामुळे आता पुढची पायरी म्हणजे या पार्टीला लोक पाण्यात ढकलून मोकळे होणार आहेत. केजरीवाल असो की ममता असो की नितीशकुमार, भ्रजपाचा दिवा विझण्याआधी मोठा होत आहे. हा दिवा आता कोणता पक्ष किंवा कोणता नेता विझवणार नाही, लोकच विझवणार आहेत. विरोधी पक्षाला ईडी लावली तर विरोधी पक्ष कमकुवत होतील पण ही निवडणूक 'गुंडगिरी विरूद्ध आम्ही भारतीय लोक' अशी झाली तर यांना तोंड लपवायलाही जागा राहणार नाही.


- विश्वम्बर चौधरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा