*श्रीपूर--बी.टी.शिवशरण.*
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक "स्वरूप दिलीप देशमुख" यांना इथेनॉल इंडिया परिषदेचा उत्कृष्ट व्यवस्थापन कार्यकारी संचालक म्हणून आज दिल्लीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वरुप देशमुख यांना मिळालेल्या पुरस्कारा बाबत माळशिरस तालुक्यातील अनेक संस्था कारखान्याचे अधिकारी वर्ग तसेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आमदार राम सातपुते तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन केले आहे स्वरुप देशमुख हे श्री चंद्रशेखर विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झालं आहे त्यामुळे श्रीपूर परिसरात त्यांचे सहकारी मित्र व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे श्रीपूर मध्ये आरपीआय आठवले गट विजय प्रताप मंच डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांचे वतीने त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख हे दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट ली कंपनी चे मुख्य सुरक्षाधिकारी दिलीपराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा