Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

*अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबास रस्त्यात अडवून अज्ञात चोरट्यांनी लुटले*

 


*तुळजापूर तालुका----प्रतिनिधी*

*चाँदसाहेब - शेख*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

           तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डाण पुलाच्या सर्विस रोडवरती कच्चा रस्त्यावर हंगरगा शिवारात चार अज्ञात चोरांनी कोयत्याचा धाक दाखवून अत्यंविधी साठी जाणारी कार थांबवुन आतील महिलेच्या गळ्यातील सोनेदागिने व रोख रक्कम एकूण ७७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवार दि ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता घडली रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सतत या रस्त्यावर अपघात होत असून अपघातासाठी हा रस्ता धोकादायक असताना आता थेट वाहनधारकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे 

         याबाबत शफीक युनुस शेख रा धाराशिव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे ,मी व माझ्या नातेवाईकासह फोर्ट फेस्टा कार क्रमांक एमएच 25 एटी 2393 ने धाराशिव येथून हैदराबाद येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना चार अनोळखी इस्मानी फिर्यादीच्या फोर्ड फेस्ट कारला कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीचे पत्नीच्या गळ्यातील व हातातील वरील वर्णनाचा व किमतीचा सोन्याचचे दागिने जुने वापरते तसेच फिर्यादीचे खिशातील दोन हजार रुपये असा एकूण 77हजार रुपयाचा जबरीने चोरून नेला अशा दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात 


 गुरंन ४०/२४कलम ३४१,३९२,३४ भादंवी अन्वय गुन्हा दाखल झाला आहे याचा अधिक तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत आहेत पोलीस प्रशासनाने या रस्त्यावर गस्त वाढवून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा सर्व्हिस रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा