*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
अकलूज येथील श्रीराम चित्र मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी दोन मित्र विकास अरुण रिसवडकर वय 26 रा. (मसूर मळा ) माळीनगर रोड ,कर्मवीर चौक-अकलूज व शुभम शिवाजी पांढरे वय 26 रा. संयुक्तानगर शंकरनगर हे पेट्रोल पंपावर जात असताना समोरून येणाऱ्या जत -जि. सांगली येथील ट्रॅव्हल्स बस नं.NL-01B -3013 या बस ने दोन तरुणांना उडवल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर खुडुस ता.माळशिरस जि. सोलापूर येथील रहिवासी असलेला ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर अक्षय रणवरे यांना अकलूज पोलिसांनी अटक केली असून विकास रिसवडकर आणि शुभम पांढरे हे लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते या दोघांचा एकाच वेळेस अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आहे
विकास अरुण रिसवडकर हे केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर विकास रिसवडकर यांना भाऊ-बहीण कोणीही नसल्याने त्यांचे तीन मामां प्रशांत जगताप, मिलिंद जगताप व अकलुज ग्रामपंचायत चे माजी सदस्य राहुल (बंटी) जगताप यांनी त्याचा सांभाळ केला होता
तरा शुभम हा सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी पांढरे यांचा मुलगा असून त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे या दोघांचा अकलुज येथील अकलाई मांदिरा जवळ आसलेल्या स्मशान भूमीत एकाचवेळी अंत्यविधी रविवार दि.4 /2/2024 रोजी सकाळी 10 वा.करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा