Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

*पाटगाव --मिरज येथील विश्वश्वैरैय्या टेक्निकल कॅम्पस मध्ये" शिवजयंती" मोठ्या उत्साहात साजरी*

 


*सांगली ----प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्युज मराठी

             शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगली संचलित विश्वेश्वरैय्या टेक्निकल कॅम्पस पाटगाव मिरज येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पारगाव येथील प्रसिद्ध देवस्थान श्री दंडोबा देवस्थान येथून विद्यार्थ्यांनी शिवज्योत धावत आणण्यात आली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. इंद्रजीत यादव-पाटील यांच्या हस्ते शिवज्योतीचे महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत ढोल ताशा आणि मुलींची लेझीमच्या खेळाने शिवज्योत व शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.संस्थेचे सचिव सतीश शिवाजीराव इंगवले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 



            अनिकेत कांदेकर या विद्यार्थ्याने आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव इंगवले,कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.



          या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.ए.आर.पाटील आणि निशांत पाटील,विद्यार्थी समन्वयक विनायक पाटील,प्रतीक क्षीरसागर,स्वप्निल घोडके यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा