*श्रीपूर---बी.टी.शिवशरण*
*गुरु योग्यांचे मंडण
गुरु भक्तांचे भूषण साधकांचा विसावा गुरुचरणी
गुरुंनी पापियासी तारिले गुरु भवभय संहारिते
भक्तांसी आसरा मिळे गुरुचरणी
गुरु भक्तांचा श्वास
गुरुंचे आम्ही दास
गुरु सांगे नामाचाच घ्यावा श्वास
गुरुंचे आम्ही दास
गुरु सांगे नामाचाच घ्यावा श्वासोच्छ्वास
भगवंत देई दर्शन खास
*सालाबादप्रमाणे यावर्षी सद्गुरू ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे त्यानिमित्त श्रीपूर येथे श्रीराम भक्त सेवा मंडळ श्रीपूर यांचे वतीने किर्तन महोत्सव होत आहे अशी माहिती श्रीराम भक्त मंडळ यांनी दिली आहे*
बुधवार दिनांक 14फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प.कु. विद्यागौरी ठुसे सातारा गुरुवार 15फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प.कु. विद्यागौरी ठुसे सातारा
शुक्रवार दिनांक 16फेबृवारी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. पुरुषोत्तम गणपत धुमकेकर नागपूर शनिवार 17फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. पुरुषोत्तम गणपत धुमकेकर नागपूर रविवार 18फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. विलासराव गरवारे सर सिध्देश्वर कुरोली सोमवार 19फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. स्मिता प्रभाकर अजेगावकर पुणे मंगळवार दिनांक 20फेबृवारी 2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. स्मिता प्रभाकर अजेगावकर पुणे बुधवार दिनांक 21फेबृवारी2024रोजी सायंकाळी सात ते नऊ ह.भ.प. स्मिता प्रभाकर अजेगावकर पुणे यांचा किर्तन महोत्सव होणार आहे
*श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विष्णु याग दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे तसेच शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी श्रीपूर महिला भजनी मंडळ यांचे भजन व दुपारी चार ते पाच हळदी कुंकू सात वाजेपर्यंत होईल बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी जन्मकाळ सकाळी नऊ चाळीस वाजता तसेच जन्मकाळाचे किर्तन वेळ सकाळी दहा ते बारा वाजता होईल त्यानंतर साडे बारा ते दोन महाप्रसाद होणार आहे श्रीपूर व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भक्त मंडळ श्रीपूर यांनी केले आहे*
*सदर सर्व जन्मोत्सव सोहळा श्री हनुमान मंदिर श्रीपूर येथे होणार आहेत*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा