Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ मार्च, २०२४

*मराठवाड्याच्या घरून क्षेत्रातील पाणीसाठा आटला--- पहा काय आहे परिस्थिती*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी* 

*मो.-84088 17333

               महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील ७५० लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाण्याची पातळी सध्या केवळ १२.९२ टक्के इतकीच राहिली आहे, जी गेल्या वर्षी या वेळी ३४.२८ टक्के इतकी होती.

पाटबंधारे विभागाने २२ मार्च रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी या आठ जिल्ह्यांतील ७५० प्रकल्पांमधील पाणी पातळीचा अहवाल प्रसिद्ध केला.

या धरणांतील एकूण पाणीसाठा २१०.९१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्याची टक्केवारी मराठवाड्यातील या धरण क्षमतेच्या १२.९२ टक्के आहे. गेल्या वर्षी २२ मार्च रोजी हा पाणीसाठा ५७८.०६ एमसीएम म्हणजेच एकूण क्षमतेच्या ३४.२८ टक्के होता.

त्यामुळे या धरणांतील एकूण पाण्याची पातळी ३४.२८ टक्क्यांवरून १२.९२ टक्क्यांवर उतरली आहे. ही घट २१.३६ टक्के इतकी आहे. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सर्वात कमी जलसाठा जालना येथे आहे, तेथील ५६ प्रकल्पांमध्ये फक्त २.४० एमसीएम पाणी आहे, जे साठवण क्षमतेच्या १.४२ टक्के इतके आहे. नांदेड जिल्ह्यातील ८० सिंचन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ३६.०९ टक्के पाणीसाठा आहे,

असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अन्य ठिकाणची जिल्हानिहाय लघु पाटबंधारे प्रकल्प आणि त्यांची साठवण स्थिती पुढील प्रमाणे : छत्रपती संभाजीनगर- १३.३७ टक्के, बीड- १०४९ टक्के लातूर- ११.८३ टक्के,धाराशिव ९.३४ टक्के .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा