*विशेष----प्रतिनिधी*
*राजु (कासिम)मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.-84088 17333
लहानपणापासून ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले, संस्कार दिले अशा शिक्षकांना आपण आयुष्यभर विसरले नाही पाहिजे. आपल्या अंगातील कलागुण, विचार, सुप्तगुण यांना याच शिक्षकांनी वाट करून दिलेली असते त्यामुळे शिक्षकांच्या बद्दल आपल्या मनात आदरभाव ठेवणे गरजेचे असल्याचे मत आनंदनगर शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संतोष कोले यांनी श्री जयसिंह मोहिते पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर शाळेतील इयत्ता चौथी वर्गाच्या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमात मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी केंद्रीय मुख्याध्यापक संतोष कोले, श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मल्हारी घुले सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे सर, पूर्व प्राथमिक प्रमुख अनिता सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीतावर नृत्य सादर केले, शाळेविषयी, शिक्षकांविषयी मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावेळी चौथीच्या वर्गाकडून आठवण भेट म्हणून महापुरुषांच्या प्रतिमा शाळेस देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी उबाळे हिने केले. आभार वर्गशिक्षिका शुभांगी कदम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र कवटे, नवनाथ राऊत, सुनिल काळे, गणेश म्हसवडे,सुरेश माने, संतोष कदम, शिक्षिका शुभांगी कदम, आरती दोरकर,रोहिणी गायकवाड, विजया पेटकर, शिला भूमकर आणि इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा