Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ मार्च, २०२४

* *प्रतिकुल* *परिस्थितीतुन,शुन्यातून विश्व निर्माण करणारे-- स्व.रमजान शेख (मेस्ञी ) व त्यांच्या पुढील पिडीची यशोगाथा अभिमानास्पद- इक्बाल मुल्ला*

 


*संपादक ---हुसेन मुलाणी

*टाइम्स 45 न्युज मराठी

*मो. 9730 867 448

                21 व्या शतकात 0 रुपये भांडवल नसताना, यशस्वी होणे अशक्य आहे .तथापि 1979 साली काहीही भांडवल - पैसा नसताना ,सांगली - कोल्हापूर रोड ,आकाशवाणी या निर्जन ठिकाणी , एक तरुण हिरारीने "व्यवसायात" पदार्पण करतो, ज्या ठिकाणी रस्ता नाही ,पाणी नाही,लाईट नाही, शिवाय 5-5 फूट असणारे झाडांचे "जंगल" अशा विदारक ठिकाणी 100 फुटी रोड वर 4 चाकी गाड्यांचे रिपेयरी चे गॅरेज सुरु करतो आणि अपार कष्ट आणि जिद्दीने तो तो यशस्वी करतो. त्या "यशोगाथा" असणाऱ्या व्यक्तीचे नावं म्हणजेच स्वर्गीय .रमजान मेस्त्री (शेख ) होय.  

माझे "मार्गदर्शक" असणारे स्व .रमजान मेस्त्री यांनी रेग्युलर ग्रुप ची निर्मिती करून स्थापन केलेल्या या व्यवसायाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 



संपूर्ण आयष्यात गरजवंतांना आणि "नवनिर्मिती" करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणाऱ्या रमजान मेस्त्री यांचा "वसा" त्यांचे सुपूत्र हाजी. रियाज शेख हे उत्स्फूर्तपणे चालवत आहेत. धार्मिक- व्यवहारी आणि निकोप दृष्टीकोन ठेवून प्रामाणिकपणे जीवनपद्धती अवलंबणारे, हाजी रियाज हे आपल्या वडिलांच्या "पाऊलावर" पाऊल ठेवत व्यवसायाचा विस्तार केला आहे. 

"रेग्युलर गॅरेज" च्या ठिकाणी आज प्रशस्त "ऐस स्क्वेयर बिझनेस सेंटर" ही भव्य इमारत उभी आहे .ज्यात शेकडो दुकानगाळे /कमर्शियल जागा उपलब्ध आहे . तरुणांना अल्पदरात 'रोजगार निर्मिती' देण्याचे स्वर्गीय रमजान मेस्त्री यांचे कार्य अधोरेखित करत ,अत्यल्प दरात तरुणांना दुकान गाळे देऊन आपले "गुणकौशल्य" दाखवण्याची संधी हाजी रियाज यांनी तरुणांना दिली आहे .आज त्यांच्या भव्य कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल सर्व्हिस सेंटर , नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी जिम (हेल्थसेंटर ) खाजगी ऑफिसेस , दुकान गाळे ,कोचिंग क्लासेस, विविध कंपन्यांचे ऑफिसेस ,सर्व्हिसिंग सेंटर , आदी "सी.सी.टी.व्ही "च्या अभेद्य नजरेतून कडक सुरक्षा देऊन कार्यरत आहेत .



    1999 माझे माझे स्नेही असणारे "हाजी रमजान मेस्त्री" यांचा लेख मी लिहिला होता. आज तब्बल 24 वर्षांनी आज पुन्हा त्यांच्याबद्दल लिहिताना मला मनस्वी "समाधान" वाटतं आहे . 

 हाजी रियाज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र "अहमदअली शेख "हे देखील स्व .रमजान मेस्त्री यांच्या कर्तृत्वाचा "झेंडा" फडकावत व्यवसायात प्रगती करत आहेत .

55 वर्षांपूर्वीचा निर्जन - ओसाड रस्ता ते आज 2024 साली 100 फुटी रोडवर करोडो रुपये खर्च करून "केंद्रसरकारच्या" विशेष निधीतून साकारत असलेला - उच्च दर्जाचा रस्ता आणि सर्वच "व्यावसायिकांची" झालेली प्रगती "अभिमानास्पद" वाटली. जुन्या आठवणींना आज उजाळा मिळाला म्हणूनच या लेखाचे "प्रयोजन" केले आहे.

    इकबाल बाबासाहेब मुल्ला

( पत्रकार )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज ,

सांगली .

मोबाईल - 8983587160





8408817333

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा