*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
तब्बल दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून देण्यासाठी भाजपा आमदारानेच त्यांना चक्क रक्ताने पत्र लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. भाजपाचे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगचे आमदार नीरज झिम्बा यांनी मोदींना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पाठवले.
काय लिहिलेय पत्रात
गोरखा समुदायाच्या समस्यांवर कायमस्वरुपी राजकीय तोडगा काढण्याचे आणि गोरखा समुदायातील 11 मागास जातींना अनुसूचित जमातींचा दर्जा देण्याचे आश्वासन अद्याप अपूर्णच राहिलं आहे, अशी आठवण झिम्बा यांनी पत्रातून मोदींना करून दिली आहे. लडाखमधील कश्मिरी, नागा, बोडो, मिझो यांना न्याय मिळत असताना गोरखा समुदायाकडे सातत्याने मोदी सरकारने दुर्लक्षच केल्याचे झिम्बा यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडे या मुद्दय़ावर तोडगा काढण्याची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे गोरखा समुदायाला न्याय देण्याची वेळ आता आली आहे असे झिम्बा यांनी पत्रात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा