Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ५ मार्च, २०२४

*समाजोद्धारासाठी शिक्षण क्षेत्राची प्रगती महत्त्वाची ---"अनिल कांबळे यांचे "प्रतिपादन*

 


*कोल्हापूर जिल्हा -- प्रतिनिधी*

*प्रा.विश्वनाथ पाटील

*टाइम्स 45 न्युज मराठी.

                कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) / तारीख : 5:" शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून असते. सध्या शिक्षणावर शासनाचा खूपच कमी खर्च होतो. समाजोद्धारासाठी शिक्षणाची प्रगती होणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन नांदारी ( ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथील लघुचित्रपट निर्माते, दिग्दर्शक अनिल कांबळे यांनी केले. येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ( कै.) यशवंत एकनाथ पाटील यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित जयंती कार्यक्रमात अनिल कांबळे दिग्दर्शित ' नारी', 'पुडी ' हे लघुपट दाखविण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते. 


   अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी यशवंतदादांच्या कार्यकर्तृत्वाचे सिंहावलोकन केले. 


   प्रा. संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. योगिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पहिल्या सत्रात ऐश्वर्या पोतदार यांनी आभार मानले. तर लघुचित्रपट प्रक्षेपणाच्यानंतर कृष्णात मोहिते यांनी आभार मानले. यावेळी प्रा. गुलनास मुजावर, एस. के. पाटील, अनिल इंदुलकर यांच्यासह दोन्ही वर्गांचे विद्यार्थी - शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा