इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी मोबाईल 8378081147
- बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पल्स पोलिओ अभियानांतर्गत ५१ केंद्रावर सुमारे ४४९३ बालकांना ९८ टक्के पोलिओ लस देण्यात आली. त्यामध्ये ऊसतोडणी, विटभट्टी कामगारांच्या मुलांनाही लस देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा अंतर्गत आठ उपकेंद्रांतंर्गत येणारे ५१ बुथवर ४५७० अपेक्षित लाभार्थी बालकांपैकी ४४९३ बालकांना पोलिओ लस देण्यात आली. जवळपास ९८ टक्के लसीकरण करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ अभिषेक ताटे, सुपरवायजर बाबुशा ईश्वर कट्टी, आरोग्य सहाय्यक प्रदिप बोडरे यांनी योग्य नियोजन केले.
गणेशवाडी, शिंदेवस्ती येथे लसीकरणाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घोगरे, सुधाकर कांबळे, पत्रकार शौकत तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय समुह संघटक डॉ सुमित्रा कोकाटे, आशासेविका रफिया तांबोळी, अंगणवाडी मदतनीस बशीरा तांबोळी, योगेश तावरे, रविंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग कुदळे आदिसह मान्यवर उपस्थित होते.
राज्यात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात आले. लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पिंपरी बुद्रुक, सराटी, निर निमगाव, लाखेवाडी, शहाजीनगर, भोडणी, भांडगाव, बावडा उपकेंद्रातील बालकांना पोलिओ लसीकरण मात्रा देण्यात आली.
फोटो - गणेशवाडी येथील अंगणवाडी केंद्रात पोलिओ लसीकरण मात्रा देताना डॉ सुमित्रा कोकाटे, बशीरा तांबोळी, आशासेविका रफिया तांबोळी.
.....................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा