Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ मार्च, २०२४

महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ व तुतारी वाजवणारा माणूस चिन्हाचे लोकार्पण श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात संपन्न

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

             - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ व तुतारी वाजवणारा माणूस चिन्हाचे लोकार्पण श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात करण्यात आले.



    नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ व तुतारी वाजवणारा माणूस चिन्हाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, अमोल भिसे, सागर मिसाळ, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसाळकर, शहराध्यक्ष रेश्मा शेख, सौ अश्विनी सरवदे, दत्तात्रय तोरसकर गुरूजी, समाधान बोडके, बाळासाहेब कोकाटे, विकास खिलारे, मोहन काटे, सतीश माने, केशव सुर्वे, युवराज गायकवाड, अंकूश दोरकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

    ॲड तेजसिंह पाटील म्हणाले, श्री लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद व जनतेच्या पाठिंब्यावर सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने संसदेत पोचतील. भाजपा सरकार खोटारडे असून नुसती आश्वासनांची खैरात करत जनतेला गाजराची पुंगी दाखवत आहे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम धर्माला आरक्षण देण्यात असमर्थ ठरले आहे.



   महारूद्र पाटील म्हणाले, मागील दहा वर्षांपासून केंद्रात भाजप सरकार असतानाही सुप्रिया सुळे यांनी चांगल्या कामकाजाच्या जोरावर दोन वेळा महासंसदरत्न व आठ वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावले आहेत. संसदेत शेतकऱ्यांची बाजू घेवून आवाज उठवला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले होते. दुष्काळाच्या बाबत केंद्र व राज्य सरकार गंभीर नसून चारा व पिण्याचे पाण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकार बद्दल चीड निर्माण झाली असून सुप्रिया सुळे सातही मतदारसंघात मिळून तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील.

    अशोक घोगरे म्हणाले, शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्तेला बाजूला ठेवण्याचे काम काही मंडळींनी केले. शरद पवार यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला निवडून आणून मंत्री केले. त्यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा निधी आणून स्वतःच वाटप केला. तर शरद पवार साहेबांना सोडून भाजपसोबत गेले. विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना पराभूत करणारे लोकप्रतिनिधीचे काम हर्षवर्धन पाटील लोकसभेला करणार का यामध्ये फार मोठे राजकारण लपले आहे. इंदापूर तालुक्यातील जनता शरद पवारांच्या विचाराला मानणारी आहे.

    अमोल भिसे म्हणाले, इंदापूर तालुक्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कामाला लागली असून आमचे पक्ष व चिन्ह हे शरद पवारच असून सर्वसामान्य माणूस आमच्याबरोबर आहे परंपरेप्रमाणे लक्ष्मी नृसिंह मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

   यावेळी छायाताई पडसाळकर, रेश्मा शेख, केशव सुर्वे, सतीश माने आदींची भाषणे झाली. आभार सागर मिसाळ यांनी मानले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सात गाड्यांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. तर नरसिंहपूर येथील शनिवार बाजारात तुतारी व हलग्यांच्या निनादात प्रचाराची पत्रके वाटून जनतेला मतदानाचे आवाहन करण्यात आले. 

फोटो - नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे लोकार्पण करण्यात आले.

---------------------------



Contact 8408817333

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा