*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई:* राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी सविस्तर चर्चा केली आणि श्री महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत श्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.
महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा