*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
भय उरले नाही! शासनाचा धाक वाटत नाही, महाराष्ट्रात बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. ही बाब खेदाची! चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार घडत असल्याने तळपायाची आग मस्तकात पोहोचते.
▪दाभोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील एका पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत शाळेतील शिक्षकाने गैरकृत्य केले आहे. त्यामुळे शिक्षकी पेशाची सेवाभावी प्रतिमा डागाळली आहे.
▪बदलापूर येथील शाळेतला प्रकार दडपण्यात यश आले आहे. विरोधक काही काळ ठो ठो बोंबा मारतात, आणि कालांतराने मागे सरतात. प्रसार माध्यमांत काही दिवस या विषयावर ओरड सुरू असते. पुढे तो विषय सवडीने थंड केला जातो. हे या महाराष्ट्राचे दुर्दैव!
▪अशा बोटचेपी धोरणामुळे दुराचारींचे बळ वाढते आणि एखाद्या निष्पाप जीवाला या गैर कृत्याची शिकार व्हावे लागते.जास्तीत जास्त कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना महाराष्ट्रात एका ठिकाणी चक्क पॉक्सो लागलेल्या शिक्षकाला भरपगारी सेवेत ठेवून घेतले आहे. शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी पालकांनी प्रशासनाला इंगा दाखवत. शाळेतून त्या शिक्षकाच्या हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली.
▪संपुर्ण देशभरात अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत.पण त्या गुन्ह्यांची नोंद अथवा तक्रार न दिल्याने कारवाई होत नाही. मुळातच आपल्या समाजात जागरूकता कमी असल्याने या नराधमांचे फावते.
▪दाभोळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी शाळा सुटल्यावर घरी एकटीच जात होती. तीला शिक्षकाने थांबवून तुला घ्यायला घरातले कुणी आले नाही काय?असे विचारले. कुणी येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर मोटारसायकल वरून घरी सोडतो असे तीला सांगितले. तिच्या घरी कोणी नाही हे पाहून शिक्षकाने तिच्या सोबत गैरकृत्य केले, कुणाला काही सांगू नकोस अशी धमकी दिली व पळ काढला.
▪घाबरलेल्या अवस्थेत त्या मुलीने शेजारच्या लोकांना हा प्रकार सांगितला. घरातील लोकांनी ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्यात शिक्षक किशोर येलवे वय ४६ यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. अटक करुन पोलीस प्रशासनाने पॉक्सो कायदा कलम ८/१०अंतर्गत भा.दं.सं.७४. नुसार गुन्हा नोंदविला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा