🕊️ चिऊताईचे घरटे 🕊️
चिऊताईचे घरटे
आज कुठे दिसेना
इवलीशी चिमणी
दारी माझ्या बसेना ॥ १ ॥
चिऊताई चिऊताई
नको अशी रुसू
बाळगोपाळांच्या
चेहर्यावर येऊ दे हसू ॥ २ ॥
ये..ग..ये..ग चिऊताई
तुझी वाट मी पाहीन
तुझ्या आवडीचा सारा
खाऊ तुला देईन ॥३ ॥
संगणक आंतरजालाने
चिमणी गेली दूर
दारातील पशुपक्ष्यांचा
हरवला बघा सूर ॥४ ॥
चित्रातली खोटी चिमणी
नाही बोलत आम्हांला
किलबिलाट पुन्हा ऐकू द्या
एकच विनवणी तुम्हांला ॥५ ॥
चित्रातली चिमणी
चित्रातच राहु दे
आताच्या चिमुकल्यांना
घरटी तुझी पाहु दे ॥ ६ ॥
पुन्हा विण ग चिमणे
तुझं जाळीदार घरटं
चिवचिवाट तुझा ऐकण्या
दारी लावीन मी रोपटं ॥७ ॥
*कवयित्री*
*सुवर्णा घोरपडे*
*संग्रामनगर अकलूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा