Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ मार्च, २०२४

*रमजान मधील "जकात "ची रक्कम जे खरे हकदार आहेत त्यांना मिळाले तरच "जकात सार्थक होईल--इक्बाल मुल्ला*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

प्रत्येक शहरात हजारो "गरजवंत" आहेत .शेकडो बेरोजगार आहेत . प्रत्येक व्यक्तीच्या अनेक गरजा आहेत .तथापि रमजान मध्ये बाहेरील, इतर राज्यातील अनेक लोक रमजान चा चंदा मागण्यास येतात . स्थानिक उपाशी असताना परराज्यातील लोकांना आपण जकात द्यावी का ??? स्थानिक बेरोजगार असतील तर त्या पैशातून एखाद्या बँकेप्रमाणे जकात चा पैसा साठवून रोजगाराच्या असंख्य "संधी" आपण नवउद्योजकांना देऊ शकत नाही का ??? त्यांना स्वयंभू बनवू शकत नाही का ??? रमजान च्या जकात च्या पैशाचा सदुपयोग करू शकत नाही का ??? 

 रमजान ची जकात कुणाला द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न ..किंबहुना जर एक -दोन मुलांना काखेत किंवा पर्स मध्ये घेऊन, ब्लाउज मध्ये महागडा अँड्रॉइड मोबाईल बाळगणाऱ्या त्या महिला येत असतील तर त्यांना जकात दिली तर त्याचे खरोखर पुण्य लाभेल का ??? का ,दारासमोर जे फकीर येतात त्या बोगस फकिरांना ?? जे तुमचेच पैसे, इतर फकिरांना 3% व्याजाने इतरांना फिरवतात व अल्लाह के नाम पे दो असे म्हणणात त्यांना ??? का ,जे "बस स्टॅन्ड" समोरील एका दारु च्या गुत्त्यावर नित्यनियाने येतात ..आणि तुमच्या दारासमोर येऊन तुम्हालाच सांगतात ..अल्लाह के नाम पे दे दो . त्यांना ???



 बेनामी ट्रस्टच्या माध्यमातून लोकांकडून जकातचे लाखो रुपये घेऊन वर्षभर स्वतःचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या व आपले घर भरणाऱ्या व ट्रस्टचा कोणताही आर्थिक हिशोब न ठेवणाऱ्या त्या लोकांना ????

की, मदरसा च्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून आलेल्या त्यांच्या प्रतिनिधींना ???



प्रेषित महंमद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार जकात ची रक्कम सर्वप्रथम आपल्या गरीब नातेवाईकांना देण्यास सांगितले आहे .त्यानंतर असे लोक ज्यांना हात -पाय नाहीत ,व इतरांवर अवलंबून आहेत अशा "मिस्कीन" लोकांना ! त्यानंतर आपल्या घराजवळ असणाऱ्या गरीब -गरजू लोकांना ! परंतु आज आपला जकातचा पैसा कुणाला देत आहोत ??? एखाद्या बेरोजगार तरुणाला व्यवसाय करायचा असेल तर त्याला बँकेत "कर्ज" काढावे लागते. सांगली शहराचा विचार करता ,कित्येक प्रामाणिक व बेरोजगार - गरजू तरुण व्यवसाय करण्याच्या प्रतीक्षेत आहेत तथापि त्यांना कर्ज मिळत नाही . कर्ज नाही ,व्यवसाय नाही त्यामुळे कुटुंबाची आर्थिक प्रगती नाही .आज मुस्लिम समाजाच्या रमजान महिन्याच्या माध्यमातून बेरोजगाराला एक भक्कम "पाठबळ" देण्याचे "माध्यम" निर्माण होत असताना समाज आणि समाजाचे प्रमुख या महत्वाच्या विषयावर "शांत" का असतात ?? इतर विषयात त्या जेष्ठ लोकांना जास्त इंटरेस्ट असतो. परंतु जकात च्या भविष्यातील लाभाबद्दल "समाजप्रबोधन" का केले जात नाही ?? असे का ??? 



सांगलीतच नव्हे तर महाराष्ट्रात असे कित्येक असे लोक आहेत ज्यांची वर्षाची जकात ही "एक लाख" ते एक करोड च्या आसपास असते . अशा काही लोकांना व सर्वच मुस्लिमाना विश्वासात घेऊन , मुस्लिम समाजाच्या "राजकीय" सामाजिक* कार्यकर्त्यांविषयी "विश्वास" नसेल तर ,खात्रीशीर उद्योजकांना एकत्र करून ,"विश्व्सनीय" बिझनेसमेन लोकांच्या हाती हे काटेरी "शिवधनुष्य "देण्याचा निर्णय आपण घेतला पाहिचे. 



समजा पहिल्या वर्षी 40-50 लाख रुपये जमले तर त्याच्या माध्यमातून ती रक्कम छोट्या व्यावसायिकांना तें पैसे बिनव्याजी कर्जरूपाने आपण देऊ शकतो .किंवा त्या पैशातून केवळ 4 - 5 लोकांनाच बिनव्याजी कर्जरुपात तें पैसे देऊ शकतो. बांधवानो ,असे केल्यास ज्या तरुणांना आपण कर्ज दिले आहे ,तें पुढील वर्षी "आर्थिकदृष्ट्या" संपन्न होतील व त्यांची स्वतःची जकात तें देऊ शकतील. जकात द्या म्हणून पैसे मागणारे ,पुढील वर्षीही तुमच्याकडे येणारच . आधी दिलेले पैसे कुठे गेले ?? तर ,त्या पैशाचा उपभोग त्यांनी घेतलेला असतो व "हात पुसून " पुन्हा नव्या जोमाने जकातचा पैसे मागण्यासाठी तें पुन्हा आलेले असतात .व तुम्हाला मूर्ख बनवत असतात .

आज वीस हजार रुपयांचा (20,000) मोबाईल " महागडा ड्रेस आणि वर "बुरखा" घालून एखादा मुलगा-मुलगी काखेत अडकवणाऱ्या व जकातचे पैसे मागण्यासाठी आलेल्या महिला सर्वत्र आढळतात .रमजान व्यतिरिक्त दररोज या महिलांची "कमाई 1500 तें 2000 रुपये इतकी असते . रमजान मध्ये, जकातच्या माध्यमातून अथवा फितरा --च्या माध्यमातून मुस्लिम समुदाय यांना निसंकोच "मदत" करतात . रमजान मध्ये यांना दररोज किमान 3000 4000 रुपये मिळतात .विचार करा रमजान सोडून 60000 रुपये महिन्याची कमाई . व रमजान मध्ये एक लाख ! 

(सर्वच फकीर -महिला बोगस नसतात ,काही खरंच गरजू ही असतात हेही तितकेच खरे आहे,) असो , आज सर्वसामान्य माणूस कष्ट करून चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो . 20 हजार मिळेपर्यंत " घामाच्या" धारा वाहतो .परंतु बिनभांडवली धंद्याच्या माध्यमातून आपण आपण फकीर व त्या महिलांचे घर समृद्ध करत असतो. आज विचार करण्याची वेळ आली आहे की मुस्लिम गरीब लोकांना त्यांच्या स्वयंभू बनवायचे ,की त्यांना असेच पैसे देत "अपंग -लाचार" बनवायचे ?? गरजवंतांना आपण त्यांच्या पायावर उभे करूया . मित्रांनो ,"कणखर " मनाने निर्णय घ्या ! रमजान ची जकात ही योग्य व्यक्तीच्या हातातच जायला हवी . नियोजन करून, बँकेसारखी समांतर व्यवस्था मुस्लिम उद्योजकांनी निर्माण करावी . जेणेकरून " श्रीमंत -गरीब" ही "दरी" राहणार नाही .किंबहुना आर्थिक" विषमता" कमी तरी होऊ शकेल . स्थानिकांची जकात ही त्याच शहरातील गरजूंसाठी ,स्थानिकांसाठी उपयोगास आणावी. 

आता हे काटेरी शिवधनुष्य कोण उचलणार हाच यक्षप्रश्न आहे .धन्यवाद !


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

*( पत्रकार)*

संपादक - सांगली वेध ,

सांगली . संपादक - वेध मीडिया न्यूज , सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा