*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग माळशिरस यांना महाराष्ट्र विकास युवा सेना पक्षाचे जिल्हा संघटक साईराज अडगळे यांनी निवेदन देवून माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांचे जातीचे व विविध शैक्षणिक दाखले दाखले त्वरित देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.यावेळी युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,उप शहाराध्यक्ष अजय माने,शहर संघटक चेतन साठे,सुजित शिंदे,ज्ञानेश्वर लोखंडे,पृथ्वीराज धाइंजे,विशाल पाटोळे उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्या अभावी वेगवेगळ्या परीक्षा देता येत नाहीत,त्यांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.उपविभागीय अधिकारी कर्यालयातून दाखला लवकर सोडला जात नाही अशा तक्रारी महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडे विद्यार्थ्यांनी केल्या आहेत असे महाराष्ट्र विकास युवा सेनेच्या निवेदनात म्हटले आहे.दाखले वेळेवर न मिळाल्याने सद्या पोलीस भरती प्रक्रिया चालू असून फॉर्म भरताना जातीच्या दाखल्याची आवश्यकता असून तो वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विविध दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित केला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि जातीचे दाखले त्वरित देण्याची व्यवस्था न केल्यास महाराष्ट्र विकास युवा सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा