*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
सोलापूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील माळशिरस तालुक्याने सलग दोन वेळा सांस्कृतिक स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले हे अभिमानास्पदच आहे.असे गौरवोद्गार अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी काढले.
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी आणि गुरुसेवा शिक्षक परिवार यांच्यावतीने सोलापूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2024 या स्पर्धेतील विजेता, उपविजेता, पारितोषिक प्राप्त व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
*जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील* क्रिकेट टीम-विजेता, संगीतखुर्ची शहजादी काझी-विजेती,थाळी फेक,भालाफेक,गोळा फेक रुपाली आसबे-विजेती,
कॅरम स्पर्धा सिंगल-उमेश होले उपविजेता,डबल-उमेश होले व विष्णू जायभाय उपविजेता, महिला कॅरम डबल-दिपाली तापोळे व वनिता शिंदे उपविजेती,
3000मी.चालणे लता निंबाळकर-तृतीय
*सांस्कृतिक स्पर्धा पारितोषिक प्राप्त कलाकार*
उत्कृष्ट सूत्रसंचालक-गिरीजा नाईकनवरे,
वैयक्तिक नृत्य, प्रथम-श्रीम.नाझनीन शेख
कविता सादरीकरण -प्रथम-प्रकाश काळे
एकपात्री नाटक तृतीय-अशपाक मुलाणी
*लघुनाटिका- प्रथम-*
संकल्पना व दिग्दर्शन अशपाक मुलाणी, सहभागी कलाकार
जगदीश गोडसे,आमिरपाशा शेख,अनुप जाधवर,राबिया शेख,किरण घाडगे-माने,वनिता शिंदे,नाजनीन शेख,दीपाली तापोळे, नीता बुगड,नितीन साने,सर्जेराव शिंदे,बाबा धोत्रे,अशपाक मुलाणी.
यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते- पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील जिल्हा सोसायटीचे संचालक विठ्ठलराव काळे, संभाजीराव फुले, तालुका सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल नष्टे,अनिल जाधव तालुकाध्यक्ष नितीन बनकर,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष प्रदिप आवताडे,सादीक शेख,पांडू वाघ,विजय साळवे, सर्जेराव शिंदे, विकास बडवे, श्रीकांत राऊत,समीर कोरबू, नागनाथ वाघमोडे, प्रेमनाथ रामदासी,किरण डोंगरे,अमित भोसले,अरुण एकतपूरे व संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्व स्पर्धकांना
सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्रिक साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा