*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आणि लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचे स्टार प्रचारक विकासराव लवांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक सरचिटणीस मोहित गायकवाड यांच्या अकलूज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा मोहित गायकवाड व समाज भूषण बाळासाहेब गायकवाड यांनी शरद पवार साहेबांचे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला.
माढा लोकसभा मतदार संघात उमेदवार निवडीचे धामधूम सुरू असताना अकलूज येथे खा.अमोल कोल्हे यांच्या समवेत विकासराव लवांडे आले होते. अकलूजमधील राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य युवक संघटनेचे सरचिटणीस मोहित गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी ते आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा