*उपसंपादिका----नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
- जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर या संस्थेने दहाव्या वर्धापन दिनाचे आैचित्य साधून लेखक इंद्रजित पाटील यांच्या ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार साेलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक याेगीराज वाघमारे यांच्या नावाने दिला जाणार आहे असे अधिकृतरित्या पत्राद्वारे संस्थेचे अध्यक्ष डाॅ.दिपककुमार खाेब्रागडे,सरचिटणीस डाॅ.रवींद्र तिरपुडे यांनी कळवले आहे.३१मार्च २०२४,वार - रविवार राेजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन,मधुरम सभागृह,दुसरा माळा,झाशी राणी चाैक,सीताबर्डी,नागपूर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास मिळालेला हा महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार आहे.त्यामुळे लेखक इंद्रजित पाटील यांचे विशेष काैतुक हाेत आहे.लवकरच त्यांचा परिपूर्ण अष्टाक्षरी ' कळ पाेटी आली आेठी ' हा कवितासंग्रह प्रकाशित हाेत आहे.
माधवराव कुतवळ,जनसेवक अमाेल ( भैया ) कुतवळ, पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी लेखक इंद्रजित पाटील यांचे विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा