Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मार्च, २०२४

*४०० सोडा १५० जागा तरी जिंकून दाखवा;-- प्रकाश आंबेडकर यांचे नरेंद्र मोदींना आव्हान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

             अकोला :--आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपने तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा केला असून ‘अबकी बार ४०० पार'चा नारा दिला आहे. यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ४०० चा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात, असं थेट आव्हान केले आहे. अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाज मेळावा पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्रातील सरकार हे केवळ धन दांडग्यांचे अन् व्यापाऱ्यांचं आहे. यामुळे देशातील कष्टकरी व शेतकऱ्यांनी हे सरकार उलथवून टाकावं. केंद्र सरकार वस्तुस्थितीपासून दूर पळत आहेत. त्यांना आपल्या विजयासाठी अन्य पक्षात फूट पाडावी लागत आहे. भाजप हा इतर पक्षातील नेते आणि आमदार फोडून पक्षात घेईल व सरकारे पाडेल, मात्र मतदारांना ते कसे विकत घेणार?, असा सवालही आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा