Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

*संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा साडी चोळी देऊन "महिला दिन" साजरा ...*

 


*अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार ----लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

               जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संग्रामनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा साडी चोळी देऊन पुष्पहार घालून सन्मान करू एक वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला आहे.

         



   ८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने वर्षभर रस्त्यावरील साफसफाई करणा-या महिला कामगारांचा प्रदेश सदस्या शिवमती आक्काताई माने,प्रदेश सदस्या शिवमती प्रियाताई नागणे व माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अकलुज शहर अध्यक्ष शिवमती शुभांगी क्षिरसागर,शहर कार्याध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण,संघटक शिवमती कल्पना चव्हाण,संघटक शिवमती सुवर्णा क्षिररसागर,संघटक शिवमती आशा सावंत,शिवमती सुवर्णा गोरवे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रसिध्दी प्रमुख शिवमती वंदना पवार,शिवमती संगीता जगदाळे शिवमती विजया शिंदे,शिवमती संगीता मगर,शिवमती सुनिता नडगिरे,शिवमती सुजाता लावंड, शिवमती रंजना लावंड उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा