Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

ॲड.प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले एकञित आल्यास ६ जागा निवडून येऊ शकतात आणि विरोधकांच्या १० जागा पडू शकतात.

 


श्रीपूर ---बी.टी. शिवशरण

            लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची केवळ औपचारिकता उरली आहे सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली आहे जाहीर करणे व उमेदवार निश्चित करण्यात त्यांचे वेळापत्रक सुरू झाले आहे या सर्व वाटचालीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा नेते अँड प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे मात्र जागा वाटपावरून त्यांचे व महाविकास आघाडीचे सुत जुळणे कठीण वाटते आहे तीच परिस्थिती आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या बाबतीत आहे ते भाजप शिंदे गट अजित पवार यांच्या महायुती बरोबर असल्याने त्यांनी त्यांचे कडे आरपीआय पक्षाला किमान दोन जागा सोडण्याची मागणी केली आहे मात्र महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला कुठेही जमेला धरल्याचे दिसून येत नाही महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर वंचित बहुजन आघाडीची राज्यात मोठी ताकद निर्माण झाली आहे आंबेडकर यांच्या जाहीर सभांना मिळत असलेला वाढता पाठिंबा लक्षात घेतला तर निश्चितच त्यांच्या किमान चार जागा निवडून येऊ शकतात तसेच आरपीआय आठवले गट यांचीही राजकीय ताकद मोठी आहे पश्चिम महाराष्ट्रात आरपीआय मजबूत स्थितीत पहायला मिळतो महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले यांनी दोघांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडी व आरपीआय युती करुन लोकसभा निवडणूक लढली तर शिर्डी अकोला सोलापूर पुणे अमरावती सांगली व मुंबई मधील जागा निश्चित निवडून येऊ शकतात तसेच या दोघांच्या पक्षांमुळे विरोधकांच्या दहा जागा पडू शकतात असे एकंदरीत वातावरण आहे दलित समाजाची आग्रही भूमिका आहे या दोघांनी दुसऱ्याच्या वळचणीला न जाता स्वाभिमानाने ऐक्य घडवून लोकसभा निवडणुकीत एकी करावी जातीवादी प्रवृत्ती व धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ऐक्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन ही निवडणूक दोघांनी एकत्रित येऊन लढली जावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा