*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
धर्मपुरी (ता.माळशिरस ) येथील कुमारी किरण भाऊसो पाटोळे या शाळकरी मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तिच्या कुटुंबीयास युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर शिवसेना उपतालुका प्रमुख अमोल उराडे युवा सेना उपतालुका प्रमुख रुपेश लाळगे यांनी सांत्वनपर भेट दिली यावेळी सचिन भोसले सागर साळुंखे उपस्थित होते.
कुमारी .किरण भाऊसो पाटोळे (वय १७) असे मयत मुलीचे नाव असुन नुकताच तिने १२ वी विज्ञान शाखेत नातेपुते येथील डॉ बाळकृष्ण दाते प्रशाला येथे शिकत होती.पेपर अवघड गेल्याने ती नाराज असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले होते.
नातेपुते पोलिस ठाणे येथे तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार १२ वी बोर्ड परीक्षा झाल्यापासून ती सतत नाराज होती.
दि.७ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास किरण पाटोळे नेहमीप्रमाणे आपल्या भावंडांबरोबर गप्पा मारत बसली असता. अचानक पणे मला कपडे बदलायचे आहेत असे सांगून घरांतील रुम मध्ये जाऊन आतुन दरवाजा बंद करून लोखंडी ॲगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.बराच वेळ झाला अजुन बाहेर आली नाही म्हणून दरवाजा बंद असल्याने बाहेरून खिडकीतून पाहिले असता किरण गळफास घेऊन लटकलेली दिसली.लागलीच कुटुंबियांनी तिला नातेपुते येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले ती मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
"टिप"
दि 4 मार्च 2024 रोजी तिचा वाढदिवस होता वडिलांकडून 1 हजार रुपये घेऊन शाळेतील मुलींना तीने वडा पाच ची पार्टी दिली आणी आज ती त्याचं मैत्रिणी मध्ये आणी कुटुंबामध्ये नाही हे तिच्या वडिलांचे आणी आई बोल ऐकून मन हेलावून गेले .विध्यार्थी मित्राहो आपले आयुष्य खूप लाख मोलाचे आहे असे सहजा सहजी संपवू नका परीक्षेचे पेपर अवघड गेले म्हणून आयुष्य संपवू नका .धैर्याने लढा संघर्ष करा डबल परीक्षा द्या .त्यातून ही नाही पास झाले तरी लढत रहा पण हा लाख मोलाचा देह सहजा सहजी हार माणून सोडू नका आई वडिलांचा भाऊ बहिणीचा विचार करा ही आपणास विनंती
गणेश इंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा