*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
राज्य सरकारने बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आरटीई ऍक्ट कायद्यात घटनाबाह्य व नियमबाह्य पद्धतीने केलेल्या बदलाच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात 4 मार्च रोजी अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरटीई कायद्यातील घटनाबाह्य व नियमबाह्य पद्धतीने केलेला बदल त्वरित रद्द करावा अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
तत्कालीन केंद्र सरकारने 2009 मध्ये बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा कायदा केला होता यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळत होते मात्र 9 फेब्रुवारी 2024 मध्ये या कायद्यात बदल करून गरीब व गरजू मुलांना दर्जेदार शाळांमध्ये शिक्षण मिळू नये अशा पद्धतीची रचना केली आहे याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे ही अधिसूचना त्वरित रद्द करावी व आरटीईची प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या कायद्याने तात्काळ सुरू करावी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला सदरच्या मागणीला शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांनीही पाठिंबा दिला.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका सहसंघटक मिलिंद चव्हाण तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे ऋषिकेश गायकवाड आदेश थोरात महिला आघाडी शहराध्यक्षा जयश्री गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा