Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मार्च, २०२४

*सावधान ,....दुकानाबाहेर क्युआर कोड स्कॕनर लावताय?*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

           महाठगाने ,रातोरात १०० दुकाना बाहेर लावलेला क्युरआर कोड स्कॕनर बदलून स्वतः चे स्कॕनर लावुन लुटले . नवी दिल्ली :-- टेक्नॉलॉजीच्या जगात लोकांना फसविण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. बिलंदर ठग यात मागे नाहीत. लोकांना लुबाडण्याच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच जिरकपूर येथे भाजी मंडईतील १०० दुकानांच्या बाहेर लावण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅनर एका महाबिलंदर ठगाने बदलून टाकले. त्याठिकाणी आपला स्कॅनर चिकटवून निघून गेला. सकाळी जेव्हा भाजी विक्री सुरु झाली तेव्हा ग्राहकांनी स्कॅनरवर पैसे जमा करण्यसा सुरुवात केली. धडाधड पैसे लोक टाकत गेले आणि भराभर ठग आपल्या खात्यात पडलेल्या रक्कमेला मोजू लागला. त्याची भांडाफोड एका महिलेने केली. जेव्हा महिलेने ३१० रुपये स्कॅनरवर भरले तेव्हा बंटी ऐवजी जितेंद्र अमरसिंह असे नाव आले. तेव्हा सर्वांना माहिती पडले, स्कॅनर बदलून एका महाबिलंदर ठगाने पैसे उकळले आहेत. या विज्ञानयुगात सामान्य माणसाला लुबाडून श्रीमंत होण्याचे प्रकार अनेक योजले जातात. त्यातला हा एक लुबाडणुक करण्याचा प्रकार.. सावधान!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा