*तुळजापूर तालुका--प्रतिनिधी*
*चाँदसाहेब--शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील ग्रामदैवत कंचेश्वर यात्रेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार ८ मार्च महाशिवरात्री पासून मुख्य यात्रेस प्रारंभ होत आहे
शुक्रवार ८ मार्च महाशिवरात्री रोजी पहाटे पाच वाजता ग्रामदैवत श्री कंचेश्वरास विधिपूर्वक अभिषेक करून वाद्यवृंदाच्या निनादात श्रींच्या काठीची स्थापना करून यात्रेस सुरवात होणार आहे त्यानंतर सकाळी अकरा ते तीन यावेळेत उपवासाच्या पदार्थांचे अन्नदान व रात्री नऊ ते अकरा हभप सोनाली महाजन आळंदी यांचे कीर्तन शनिवार ९मार्च रोजी सकाळी नऊ ते तीन यावेळेत गावातील भजनी मंडळ यांचे भजन दुपारी चार ते रात्री अकरा यावेळेत श्रींच्या काठीची व पालखीची अश्वासह भव्यदिव्य मिरवणूक व शोभेची दारू उडवून या दिवसाची सांगता रविवार सकाळी अकरा ते चार महाप्रसादाचे वाटप रात्री सात ते अकरा गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळा , इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांचा गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने यात्रेची सांगता या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हाहन कंचेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा