*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार ----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन दि. ४ मार्च ते ११ मार्च २०२४ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.
दि. ४ मार्च हा सुरक्षितता दिन व तेथून ११ मार्च २०२४ पर्यंत सुरक्षितता सप्ताह पाळण्याचे आवाहन करण्यात आले.सदर कार्यक्रमाची सुरुवातीला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांचे शुभहस्ते करून सुरक्षितता सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.कारखान्याचे डेप्युटी चिफ् इंजिनिअर सुनिल पांडुरंग पताळे यांनी सर्वांना एकत्रितपणे सुरक्षिततेची शपथ दिली.
कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी कारखाना कर्मचारी यांना सुरक्षितता नियमांचे पालन करुन सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करुन कामे करावीत असे आवाहन केले.त्यानंतर सेफ्टी ऑफिसर पुष्पदास भानुदास रणनवरे यांनी कामगारांनी काम करत असताना काय दक्षता घ्यावी,कामगाराचे हित व कारखान्याचे हित कसे जोपासावे,विविध विभागातील अडचणींबाचत मार्गदर्शन करून सुरक्षितता विभागामार्फत कामगारांसाठी दिलेली सुरक्षा साधने याचा वापर करणेबाबत योग्य सूचना दिल्या सुरक्षितता सप्ताहामध्ये सेफ्टी विभागा मार्फत व्हिडिओ फिल्म दाखवुन जनजागृती केली.कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले,पांडुरंग (तात्या) एकतपुरे,सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख यांचे शुभहस्ते निबंध,चारोळी व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण केले.निबंध लेखन प्रथम क्रमांक सुरज गोडसे, द्वितीय क्रमांक रविंद्र दोलतोडे. चारोळी लेखन प्रथम क्रमांक विनायक कुंभार, द्वितीय क्रमांक संजय कुंभार, घोषवाक्य लेखन प्रथम क्रमांक जालिंदर कावळे, द्वितीय क्रमांक नागेश गुळवे, तृतीय क्रमांक सुहास दोशी यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
कारखान्याचे मार्गदर्शकच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल नेतृत्वाखाली कारखाना प्रगतिपथावर कार्यरत असून कारखान्याने राज्यपातळीवर व देशपातळीवरील विविध पारितोषिके मिळवणारा कारखाना म्हणून ख्याती मिळविलेली आहे.
या कार्यक्रमास पांडुरंग (तात्या) एकतपुरे,शिवसृष्टी संचालक अकलुज.कारखान्याचे सेक्रेटरी अभयसिंह माने देशमुख, चिफ अकौंटंट वाय.एस. इनामदार,चिफ केमिस्ट सुनिल जाधव,को-जन मॅनेजर वाय.के. निंबाळकर,परचेस ऑफिसर राजेंद्र गायकवाड लेबर ॲन्ड वेलफेअर ऑफिसर श्री.साळुंखे, हेड टाईम किपर श्री वाघ, सिक्यूरिटी ऑफिसर एन.सी. निंबाळकर,कामगार प्रतिनिधी तसेच सर्व कामगार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन पिसे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा