इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी राहुल अरविंद बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार- विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे असे राहुल बागल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी परीपुर्ण पणाने ग्रामीण भागात पक्ष वाढविण्यासाठी तसेच तरूणांची फळी उभी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडी प्रसंगी बोलताना राहुल बागल यांनी सांगितले.
फोटो - राहुल अरविंद बागल
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा