Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मार्च, २०२४

*आर पी आय आठवले गटाला "शिर्डी "ची जागा मिळण्याची शक्यता...*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण..

        लोकसभा निवडणुकीत भाजप मित्र पक्ष म्हणजे महायुतीत सहभागी असलेल्या आरपीआय आठवले गट या पक्षाला शिर्डी येथील जागा देण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनुसार समजले आहे त्यामुळे आरपीआय आठवले गटातील कार्यकर्त्यांची असणारी नाराजी काही प्रमाणात दुर केली जाणार आहे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची पक्ष कार्यालयात आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी गेल्या दोन दिवसांपुर्वी भेट घेऊन आपल्या पक्षाची लोकसभा निवडणुकीत आम्हाला किमान दोन जागा सोडण्याची मागणी केली आहे त्या दोन जागा पैकी सोलापूर लोकसभा व शिर्डी लोकसभा या जागांची मागणी आहे खात्रीशीर वृत्तानुसार महाराष्ट्रातील भाजपच्या स्कोअर कमीटीने आरपीआयला शिर्डीची जागा सोडण्याची अनुकुलता दर्शविली आहे या बाबतीत रामदास आठवले हे एक जागा घेतील का याची माहिती देण्यात आलेली नाही आरपीआय कार्यकर्त्यांनी सोलापूर व शिर्डी या दोन जागा कोणत्याही परिस्थितीत आरपीआयला सोडण्यात यावी या मागणीवर ठाम असल्याचे जाहीर केले आहे येत्या पंधरा तारखेला रामदास आठवले या संदर्भात अधिकृत आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे महाराष्ट्रात भाजप बत्तीस जागेवर निवडणूक लढणार आहे त्या बत्तीस जागेतील दोन जागा मित्र पक्ष असलेल्या आरपीआय ला देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवावी अशी आग्रही भूमिका रामदास आठवले यांनी घेतली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा