इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- निवडणूका जवळ आल्या की काही लोक जाती पातीच विषारी बि पेरायच समज गैरसमज पसरण्याचे काम करत असतात त्यांच्या पासून सावध राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
टणू ( ता.इंदापूर ) येथील चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आण्णासाहेब कोकाटे यांचे हस्ते फलकाचे अनावरणाने करण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, महादेव घाडगे, दत्तामामा घोगरे, सचिन सपकाळ, श्रीकांत बोडके, शुभम निंबाळकर, पांडुरंग डिसले, नवनाथ रूपनवर, दादासाहेब क्षिरसागर, नरहरी काळे, सुरेश शिंदे, साधना केकाण, उस्मान शेख, नितीन सरवदे, नागेश गायकवाड, सुनिल जगताप, मारूती मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार भरणे बोलताना पुढे म्हणाले, टणूकरांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्यासाठी आलो आहे. आपल्या गावाच्या मागासवर्गीय वस्तीची २०१२ पूर्वी रस्ते, गटार, पिण्याचे पाणी याची काय अवस्था होती. तुमच्या गावच्या पिण्याच्या पाणी हरघरजल योजनेच्या आराखडा मी तयार करून सही केली आहे. गावाला पिण्याच्या पाण्याचा टॅकर लावण्यासाठी आमदारांच्या सहीची गरज आहे. लोक आपल्यावर टिका करत आहेत. परंतू आपणाला आघाडीधर्म पाळत लोकसभेला आपल्या उमेदवाराला अडचण निर्माण करायची नाही. काही झाले तरी आपणाला कोणावर टिका टिप्पणी न करता विकास कामावर बोलायचे आहे. आपले ग्रामदैवत भर्तरीनाथाच्या दर्शनाने मन प्रसन्न होवून आत्मिक शांतता मिळाली. तर किचन ओट्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर करत आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात येईल. आडोबा वस्तीतील जोशी समाजाच्या स्मशानभूमी उभारण्यासाठी आचारसंहितेनंतर मदत करण्यात येईल. तर इनडोअर व्यायाम शाळेचे साहित्य देण्याची घोषणाही केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदत व सहकार्यामुळे सर्वकाही करता आलेले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच सोमनाथ मोहिते यांनी केले. तर आभार महावीर जगताप यांनी मानले. यावेळी प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, श्रीकांत बोडके, अंगद जगताप यांची भाषणे झाले. टणू गावच्या वेशीवर आमदार दत्तात्रय भरणे यांची ग्रामस्थांनी ऐन दुपारच्या वेळी घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.
फोटो - टणू येथे चार कोटी रुपयांच्या रस्त्याचे कामाचे फलकाचे अनावरण आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आण्णासाहेब कोकाटे यांनी केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा