*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
माढा ते वैराग रोड अत्यंत खराब झाल्याने प्रवाशांना अत्यंत त्रासदायक होत असून माढा ते वैराग रोड म्हणजेच अपघातांना निमंत्रण असे नागरिक प्रवाशातून बोलले जात आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा ते वैराग दरम्यान माढा रेल्वे गेट ते जामगाव दरम्यान आणि मालवंडी ते इर्ले दरम्यान रस्ता अत्यंत खराब झाला असुन दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना चालकांना "तारेवरची कसरत केल्या प्रमाणे "वाहन चालवावे लागत आहे.या खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होणे ,पम्चर होणे असे प्रकार होत असुन प्रवाशांनी आणखी किती ञास सहन करावा ?हे न सुटणारे कोडे असुन टेंभुर्णी ,कुर्डूवाडी , माढा ,वैराग हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुळजापूर तीर्थक्षेञाला जोडणारा एकदम जवळचा रस्ता आणि रहदारी विरहीत असल्याने भाविक व प्रवासी या रस्त्याला पसंद करतात माञ हा रस्ता मागील दहा वर्षापासुन खराब असुन भाविक सोलापूर आथवा बार्शी मार्गे जात आहेत शिवाय बार्शी आणि सोलापूर मार्गे जायचे झाले जागोजागी पोलिसांचा एन्ट्री चा ससेमिरा सहन करावा लागत आहे वाहतुक पोलिस कांहीतरी ञुटी काढून चिरीमिरी घेतात अन्यथा आॕन लाईन कारवाई करुन दंडाचा भुर्दंडा भाविकांच्या माथी मारतात त्यामुळे माढा ते वैराग हा रस्ता केंव्हा होणार भाविक या प्रतिक्षेत आहेत , सर्व भारतात रस्त्याच्या दळणवळणा बाबत आणि सँपूर्ण देशात दळण वळणाचे जाळे विणणारे केंन्द्रीय मंञी "नितीन गडकरी " यांनी महाराष्ट्रातील सर्व तीर्थ क्षेञाला दळणवळणाच्या माध्यमातुन जोडण्याचे ऐतहासिक कार्य केले असुन मंञी महोदय या खराब रस्त्या कडे लक्ष देऊन भाविकांची होणारी गैरसोय दुर करुन भाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी तातडीने या रस्त्याचे कामा करतील का?असे भाविक व प्रवासी वर्गातुन बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा