*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई ;----मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी(minister) आज योग्य त्या जागा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा असून, रात्री उशिरा या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले.
कल्याण हा शिवसेना शिंदे गटाच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री(minister) शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे करतात. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र शिंदे गटाच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाणे हा लगतचा मतदारसंघ भाजपने लढावा की शिंदे गटाने हा तिढा सुटला नसल्याने कल्याणच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मात्र हा मतदारसंघ शिंदे गटाचा असल्याने घोषणा होण्यास आमची कोणतीही अडचण नव्हती, असे भाजपतर्फे सांगितले जात आहे.
नाशिक, छत्रपती संभाजीनगर ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या मतदारसंघांबाबत तिढा आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी परस्पर घोषित केल्याने युतीत अस्वस्थता पसरली होती. आज या वादावर तोडगा काढण्यासाठी नेत्यांदरम्यान चर्चा झाली.
ठाणे : ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत तसेच आमदार सुहास कांदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. मात्र, तीन तास प्रतीक्षा करूनही मुख्यमंत्री आले नाहीत.
त्यामुळे, त्यांनी त्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री आज दिवसभर ठाण्यात होते. मात्र निवासस्थानी आलेल्या मंत्र्यांची भेट घेणे त्यांनी टाळल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी ही भेट का टाळली, हे गुलदस्त्यात असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मनात नेमके काय आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा